सुशांतचा संशयास्पद मृत्यू : निष्पक्ष चौकशीसाठी नवे मेडिकल बोर्ड स्थापन करा; रियाच्या वकिलाची मागणी

Sushant Singh Rajput

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआयने नवे मेडिकल बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानशिंदे यांनी केली. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या पूर्वनिश्चित निकालासाठी चौकशी एजन्सीवर दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी केवळ फोटोंवरून डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील फॉरेन्सिक टीमवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) डॉक्टरांनी २०० टक्के निष्कर्ष काढणे हा धोकादायक प्रकार आहे.

त्यामुळे तपास निष्पक्ष आणि कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी सीबीआयने नवे मेडिकल बोर्ड स्थापन करावे. बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तपास एजन्सीजवर पूर्वनिश्चित निकालासाठी दबाव टाकला जात आहे, असे मानशिंदे म्हणाले. सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना मानशिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह पत्रपरिषदेत म्हणाले होते की, सुशांतच्या कुटुंबीयांना वाटते की, या प्रकरणाचा तपास वेगळ्या  दिशेने व्हायला हवा. यात सर्व लक्ष ड्रग्जप्रकरणावर केंद्रित  केले गेले आहे.

‘एम्स’च्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाही. या तपासावर मी नाखूश  आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेने जाते आहे माहिती नाही. आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आले, याबाबत सीबीआयने एकदाही माहिती दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER