सुशांतचा ‘चंदा मामा दूर के’ नव्या कलाकारांसोबत पडद्यावर येणार

Sushant Singh Rajput

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनतंर त्याने मृत्यूपूर्वी जे काही सिनेमे साईन केले होते किंवा ज्या निर्मात्यांशी नव्या सिनेमाबाबत बोलणी सुरु होती ते सर्व सिनेमे आता डब्यात बंद करण्यात आलेले आहेत. काही सिनेमांचे कथानक तर सुशांतलाच डोळ्यासमोर ठेऊन लिहिण्यात आले होते. अशाच काही सिनेमांमध्ये चंदा मामा दूर के (Chanda Mama Door Ke) सिनेमाचाही समावेश आहे. सुशांतची अंतराळ आणि ग्रह, ताऱ्यांची आवड लक्षात घेऊन या सिनेमाची योजना आखण्यात आली होती आणि सुशांत यात चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराची भूमिका साकारणार होता. यासाठी सुशांतने नासालाही भेट दिली होती. या सिनेमाचा खर्च प्रचंड असल्याने ते निर्मात्याच्या शोधातही होते. पण निर्माता मिळत नव्हता. त्यातच सुशांतचा मृत्यू झाल्याने हा सिनेमा बंद करण्यात आला. पण या सिनेमाचा दिग्दर्शक आणि सुशांतचा मित्र संजय पूरण सिंह हा सिनेमा पुन्हा सुरु करण्याची योजना आखत आहे.

संजयने सांगितले, भारतात अंतरिक्षावर आधारित पहिला सिनेमा काढण्याची सुशांतची इच्छा होती. हा त्याचा ड्रीम प्रोेजेक्ट होता. यासाठी सिनेमाचे नावही नक्की करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्याने नासाला भेट देऊन माहितीही घेतली होती. परंतु निर्माता मिळत नव्हता. सुशांतला ट्रिब्यूट म्हणून मी हा सिनेमा पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी मी सुशांतशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. पण आता हा सिनेमा पुन्हा सुरु करून सुशांतचे स्वप्न पूर्ण करून त्याला अनोख्या पद्धतीने ट्रिब्यूट देण्याचा माझा विचार आहे. मागे या सिनेमाचा निर्माता मिळाला नव्हता, पण आता निर्माता मिळाला आहे. आणि आम्ही मोठ्या पडद्यावर हा सिनेमा आणणार आहोत असेही पूरणने सांगितले.

21 जानेवारीला सुशांतची जयंती आहे. त्यादिवशी या सिनेमाची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER