कंगणा प्रकरण शिवसेनेला भोवणार?, सुशांतच्या बहिणीकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

Sushant sister demands

मुंबई : चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. यातच कंगनाचं समर्थन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह (Shweta Singh) किर्ती पुढे आली आहे. श्वेता हिने थेट थेट महाराष्ट्रात राम राज्य येण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा वापरली आहे. श्वेता सिंहच्या या पोस्टवर चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत.

कंगना राणौत हिच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर भडकलेल्या कंगनानं मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करुन टीकास्त्र सोडलं. ज्या पद्धतीने आज माझं घर तुटलं तसेच तुमचा अहंकारही तुटेल असं कंगना राणौत म्हटली आहे. कंगनाच्या समर्थनासाठी आलेल्या श्वेताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे देवा, हा कसला गुंडाराज आहे, याप्रकारे अन्याय अजिबात सहन नाही केला पाहिजे. या अन्यायाला उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे आहे का? चला पुन्हा रामराज्य स्थापन करु असं तिने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER