सुशांतसिंहची आत्महत्या की हत्या?; सीबीआयने लवकर चौकशी करावी :  अनिल देशमुख

ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे, या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे.

मुंबई :  अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस व पटणा पोलिसांत मोठे वादंग उठले होते. सुशांतसिंहच्या आत्महत्या चौकशीवरून पाटणा पोलिसांनी मुंबई पोलीसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते व या प्रकरणाचा तपास सीबीआयने (CBI) करावा अशी मागणी सुशांतसिंहच्या कुटुंबियांसह त्याच्या समर्थकांकडून जोर धरली. सर्वोच्च न्यालयात हे प्रकरण गेल्यानंतर सुप्रिम कोर्टाने (SC) या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली.

या प्रकरणाला आता वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. आत्महत्या की हत्या ही चौकशी बाजूला राहीली व या चौकशीत रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ ड्रग्जप्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहे.

याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासासाठी केंद्राकडून सीबीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो विषय मागे पडला आहे. सुशांतसिंह राजपूत हत्या की आत्महत्या या प्रकणाचा सखोल तपास व्हावा, अशी ्पेक्षा आहे.

सध्याच्या कंगना वादावर अनिल देशमुख म्हणाले, या विषयावर चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. त्यामुळे या पेक्षाही अनेक मोठे विषय आहे.

तर, सुशांतच्या आत्महत्या चौकशीवर देशमुख म्हणाले, मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे केला आहे, असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे असे काही मंडळीनी ठरवले आहे. असा टोलादेखील त्यांनी विरोधकांना लगावला.

मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणात एफआयआर का देखील नाही, या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय नाही असे लिहून दिले होते, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा.’

तर, ड्रग्जबाबत देशमुख म्हणाले, मुंबईत ड्रग्जची कीड अनेक वर्षांपासूनची कीड आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर येत आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे.

पोलीस भरतीवर देशमुख म्हणाले, राज्यातील सर्वात मोठ्या भरतीचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आर्थिक टंचाई असताना देखील पोलिसांच्या घरांसाठी 700 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलिसांच्या प्रश्नावर सरकार काम करत आहे.असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER