सुशांत सिंह मृत्यू : एम्सच्या अहवालावर डीजे वाजऊ नका, निलेश राणेंचा शिवसेनेला टोमणा

- अजून खूप काही बाकी आहे; इशारा

Nilesh Rane - Sushant Singh Rajput - Sanjay Raut

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) (CBI) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) न्यायवैद्यक विभागाने दिलेल्या अहवालात अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांचा मृत्यू हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती आल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. यावरून शिवसेनेला टोमणा मारताना भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट केले आहे – … अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अजून सीबीआयच्या चौकशीचा अहवाल आलेला नाही. एम्सच्या न्यायवैद्यक विभागाने दिलेल्या अहवालात सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती बाहेर आली आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाली आहे असा त्याच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आरोप आहे. यात शिवसेनेने उडी घेतली असून, सुशांतची हत्या झाली नसून ती आत्महत्या आहे अशी बाजू लढवते आहे. त्यातही शिवसेनेचे संजय राऊत हे अतिशय आक्रमकपणे ही आघाडी लढवत आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे – महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात बदनाम करण्याचा कट रचला जातो आहे. सीबीआय चौकशीवरही आता विश्वास ठेवला जात नसेल, तर आम्ही निशब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असलेल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा अहवाल असून शिवसेना व अन्य कोणत्या राजकीय पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नाहीत.

यावर निलेश राणे यांनी टोमणा मारला आहे – SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटते की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER