सुशांत सिंह प्रकरण : संदीप सिंह आणि भाजपच्या संबंधाची चौकशी व्हावी- गृहमंत्री

Anil Deshmukh-SSR Case

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच संदीप सिंह याचं नाव समोर आल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. संदीप सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवला होता. त्यामुळे संदीप सिंहचा (Sandeep Singh) भाजपशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे भाजपकडेही संशयाची सुई वळत आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणी लक्ष घातलं असून, संदीप सिंह याचा भाजपशी काय संबंध आहे, ड्रग माफियांशी काय संबंध आहे… या संदर्भात मला अनेक निवेदने मिळाली आहेत. ती निवेदने आम्ही सीबीआयकडे सोपवली आहेत. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत.  त्यामुळे सीबीआयने याचीही चौकशी करावी, अशी मला अपेक्षा आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh0 यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर २७ भाषांमध्ये चित्रपट बनवणारा संदीप सिंह आणि भाजप यांचे संबंध असून त्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.

काही जणांनी तशी विनंतीही केली आहे. त्याचा संबंध बॉलिवूड आणि ड्रग्ज (Drugs) प्रकरणाशीही आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती मी सीबीआयकडे करणार आहे, असं म्हणत या प्रकरणी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER