राज बब्बरचा मुलगा बनणार सुशांत सिंह

Arya Babbar & Sushant Singh Rajput

सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूने चांगलीच खळबळ माजवली आहे. रोज नवीन नवीन गोष्टी उजेडात येत असल्याने हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही असे दिसून येत आहे. बॉलिवूडच्या निर्मात्यांना अशीच प्रकरणे चित्रपटासाठी योग्य वाटत असतात. त्यामुळेच सुशांतच्या मृत्यूवर काही चित्रपट आणि वेब सीरीजची योजना काही निर्मात्यांनी आखली आहे. यासाठी चित्रपटाची विविध नावेही नोंदण्यात आली आहेत. यापैकीच एक चित्रपट आहे- शशांक. सुशांतच्या नावाशी मिळतेजुळते शीर्षक मुद्दामच ठेवण्यात आले आहे.

या चित्रपटात सुशांतची भूमिका राज बब्बर (Raj Babbar) आणि नादिरा बब्बरचा मुलगा आर्य बब्बर (Arya Babbar) साकारणार आहे. आर्यने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले; परंतु त्याला पित्याप्रमाणे यश मिळाले नाही. त्याचा एक पंजाबी चित्रपट ‘गांधी फेर आ गिया’ लवकरच येणार असून त्याचा ट्रेलर नुकताच राज बब्बर यांनी ट्विटरवर रिलीज केला होता. त्यानंतर आता ‘शशांक’मुळे आर्य बब्बर चर्चेत आला आहे.

‘गांधीगिरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सनोज मिश्रा ‘शशांक’चे दिग्दर्शन करीत असून रोर फिल्म्सचे मारुत सिंह याची निर्मिती करीत आहेत. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. मात्र सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंहने या चित्रपटावर बहिष्कार करा आणि या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांवरही बहिष्कार घाला अशी मागणी सोशल मीडियावर केली आहे. एकूणच चित्रपट पहिल्या पोस्टरपासूनच सुशांतच्या मृत्यूप्रमाणेच वादात सापडल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER