सुशांतसिंग आत्महत्या; मुंबई पोलिसांनी एफआयआर का नाही नोंदवला – सुब्रमण्यम स्वामी

Subramanian Swamy - Sushant Singh Rajput

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) यांच्या आत्महत्येच्या(Suicide) प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर का नोंदविला नाही, असा प्रश्न भाजपाचे(BJP) राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी(Subramanian Swamy) यांनी शुक्रवारी ट्वीट करून केला.

पोस्टमार्टम रिपोर्टला ‘प्रोविजनल’ का म्हटले? दोन्ही प्रश्नाचे एकच कारण आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना फॉरेन्सिक विभागाकडून सुशांतचा व्हिसेरा अहवालाची मिळालेला नाही. या अहवालातून सुशांतला विषबाधा झाली की नाही हे कळेल. सुब्रमण्यम यांनी मुंबई पोलिसांनावर टीका करत मुंबई पोलिसांकडील ८० टक्के गुन्हांचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो, असा टोमणा मारला.

याआधी स्वामींनी ट्विटरवर सुशांत सिंग राजपूतची ‘हत्या’ झाली आहे असे त्यांना वाटते, असे लिहिले होते. स्वामींनी या दाव्याच्या समर्थनात कागदपत्रे पोस्ट केली होती.

दरम्यान, स्वामींनी एका दस्तऐवजाचे फोटो ट्विट केले होते. ज्यात २६ मुद्दे होते. कागदपत्रांनुसार, सुशांतच्या गळ्यावरील खुणा आत्महत्येच्या नव्हे तर हत्येच्या असल्याचे दिसते, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER