सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे भडक रिपोर्टिंग वृत्तवाहिन्यांच्या अंगलट आले

एकीला लाखाचा दंड, तिघींना जाहीर माफीचा आदेश 

Sushant Singh Rajput's death erupts

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh rajput) याच्या मृत्यूसंबंधी असंवेदनशील पद्धतीने बातम्या देणे व या मृत्यूबद्दल अवास्तव सनसनाटी निर्माण करणे याबद्दल ‘दि न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड््स अ‍ॅथॉरिटी’ने (एनबीएसओ) ‘आज तक’, ‘झी न्यूज’, न्यूज २४’ आणि ‘इंडिया टीव्ही’ या चार वृत्तवाहिन्यांना याबद्दल जाहीर माफी मागण्याचा आदेश दिला आहे. वाहिन्यांनी त्यांचा हा माफीनामा त्यांच्याच माध्यमातून ठरल्या दिवशी अनेक वेळा प्रदर्शित करायचा आहे.

‘एनबीएसओ’ ही भारतातील इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी स्वनियंत्रणासाठी स्वत:च स्थापन केलेली नियामक संस्था आहे.‘आज तक’, ‘झी न्यूज’, न्यूज २४’ या तीन वाहिन्यांनी या घटनेचे वृत्तांकन करताना संवेदनाशून्य अशा ‘टॅगलाइन’ वापरून  मृतत्म्याची  अप्रतिष्ठा केली व त्याच्या खासगीपणाचा (Privacy)  भंग केल्याबद्दल त्यांची कडक  शब्दांत निर्भर्त्सना करण्यात आली आहे.

याखेरीज सुशांत सिंग याने मृत्यूच्या काही दिवस आधी जी  ट्वीट प्रत्यक्षात  केलीच नव्हती ती त्याने केल्याचे दाखवून खोटेपणा केल्याबद्दल ‘आज तक’ वाहिनीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच या चारही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या या आक्षपार्ह कार्यक्रमांचे व्हिडिओ ‘यूट्यूब’ किंवा अन्य ठिकाणी पोस्ट केले असतील तर ते सर्व काढून घेण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
गेल्या जून महिन्यात सुशांत सिंग मुंबईत त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत सापडला होता. या अनपेक्षित व महत्वाच्या घटनेच्या पुढील काही दिवस बातम्या देताना व त्यासंबंधी चर्चात्मक कार्यक्रम सादर करताना या वृत्तवाहिन्यांनी स्वत:च  स्वत:साठी ठरवून घेतलेल्या व्यावसायिक नीतीमत्तेच्या नियमांचे ढळढळीतपणे उल्लंघन केले, असा ठपकाही या वृत्तवाहिन्यांवर ठेवण्यात आला आहे.

खास करून जूनच्या दुसर्‍या आठवड्यांत या वृत्तवाहिन्यांवर सादर झालेल्या यासंबंधीच्या कार्यक्रमांविषयी सौरव दास. ऋतुजा पाटील, वरुण सिंगला, पुलकित राठी, निलेश नवलखा आणि इंद्रजीत घोरपडे इत्यादी जागरूक दर्शकांनी ‘एनबीएसओ’कडे रीतसर तक्रारी दाखल केल्या होत्या. असेच काही अन्य दर्शक या वृत्तवाहिन्यांना आवर घालावा यासाठी उच्च न्यायाललयातही गेले होते. न्यायालयाने अशा तक्रारींवर ‘एनबीएसओएॅ`ने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी अशा सर्व तक्रारींवर नवी दिल्लीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने सविस्तर सुनावणी घेण्यात आली.

या कार्यक्रमात सुशांत सिंग याचा मृतदेह प्रत्यक्ष फासावर लटकतानाची, तो खाली बिछान्यावर अस्ताव्यस्त पडल्याची व नंतर पांढर्‍या कापडात गुंडाळून घराबाहेर नेला जात असतानाची काल्पनिक चित्रमालिकाही दाखवून काही वृत्तवाहिन्यांनी निष्कारण थरार निर्माण केला होता. ‘न्यूज नेशन’ या इंग्रजी तर ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीचा त्यात समावेश होता. असे करणे चुकीचे होते, असा ठपका ठेवला गेला. पण त्याबद्दल कोणतीही दंडात्तमक कारवाई करण्यात आली नाही. कारण ‘न्यूज नेशन’ने केल्या कृत्याबद्दल मनापासून पचात्ताप व  दिलगिरी व्यक्त केली होती. तर ‘एबीपी माझा’च्या दृश्यांमध्ये सुशांतचा मृतदेह अगदी जवळून न दाखविता, लांबून दाखविला गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER