सुशांतसिंह राजपूत आत्महत्या : रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

Sushant Singh Rajput and Siddharth Pithani

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात (Sucide Case) अमलीपदार्थ नियंत्रण विभाग (NCB) ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) याला अटक केली आहे. सिद्धार्थला हैदराबादेतून अटक करण्यात आली. सुशांतला ड्रग्ज दिल्याच्या कटात त्याचा हात होता, असा आरोप आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे .

सुशांतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली केली होती. सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र चौकशीत सुशांतने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले होते.

सिद्धार्थने घेतली होती सुशांतच्या बहिणींची नाव

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना १४ तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचे शव फासावरुन खाली उतरवले, असे सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला बांधलेला दोर कापला होता, मी सुशांतचे शव खाली काढले, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button