सुशांतला संपत्तीसाठी कुटुंबीयांनी आत्महत्येस प्रवृत्त केले का? तपास करा; शिवसेनेची मागणी

Pratap Sarnaik & sushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी एम्सने मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलं. यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं असून, शिवसेनेनं सुशांतच्या कुटुंबीयांच्या चौकशीची  मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ट्विट करत सुशांतच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते. सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला त्याच्या कुटुंबीयांनी प्रवृत्त केले का, याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा, अशी मी पोलीस आयुक्तांकडे मागणी करतो, असे ट्विट आमदार सरनाईक यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER