मोठी बातमी : रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा एनसीबीच्या ताब्यात

NCB-Sushant Singh Rajput death case

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput death case) ड्रग्ज कनेक्शन (Drugs connection) समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Bureau of Narcotics Control) रिया (Rhea Chakraborty) आणि शोविक चक्रवर्ती (Shovik Chakraborty) यांच्या घराची झाडाझडती केली. तब्बल अडीच तासाच्या झाडाझडतीनंतर एनसीबीन शौविकला ताब्यात घेतले आहे. तर सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी सर्च ॲापरेशन झाल्यानंतर त्यालाही ताब्यात असून अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सॅम्युअल मिरांडा हा जैद विलात्राकडून ड्रग्ज विकत घ्यायचा, अशी माहिती ‘एनसीबी’च्या हाती लागली आहे. त्यानुसार सॅम्युलच्या घरी सर्च ॲापरेशन सुरु करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सॅम्युल मिरांडाला अटक करण्यासाठी एनसीबीकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती आहे. तर रिया आणि शोविक चक्रवर्ती यांच्या घराची झाडाझडती केल्यानंतर ‘एनसीबी’ने शोविक चक्रवर्तीलाही ताब्यात घेतले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER