…जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात ; सुशांत प्रकरणावरून शिवसेनेचे टीकास्त्र

pratap sarnaik

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियातून मोहीम चालवली गेली होती, अशी माहिती समोर आल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे .

शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना खडसावले आहे. ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता, त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर नि:स्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे. जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER