सुशांत सिंह राजपूत प्रकरण ; सीबीआयने AIIMS चा अहवाल केला मान्य ; बैंक खात्याच्या ऑडिट रिपोर्टयामध्येही पुरावे नाहीत

Sushant Singh Rajput.jpg

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की यामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून (CBI) शोध घेतला जात आहे. याप्रकरणी AIIMS ने त्यांच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मीडिया अहवालाच्या मते आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती. तर दुसरीकडे सीबीआयला बैंक खात्याच्या ऑडिट रिपोर्टयामध्ये कोणतेही संदिग्ध पुरावे सापडलेले नाहीत. सुशांतच्या सर्व बँक खात्यांमध्ये गेल्या ५ वर्षात ७ कोटींचा व्यवहार झाला . ज्यातून त्याने ५५ लाख रुपये गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर खर्च केले होते .

एम्सच्या अहवालानुसार सुशांतने विष खाल्ले असावे असा कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. त्याप्रमाणे ही घटना घातपाताचा प्रकार असावा याबाबतही कोणताही पुरावा मिळाला नाही आहे. ना त्याच्या शरिरावर कोणतीही जखम आढळली आहे ना ही त्याठिकाणी कुणी जबरदस्तीने शिरल्याचा पुरावा आहे. सीबीआय सूत्रांच्या मते याप्रकरणात सीबीआयने 24 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, रियाचे आई-वडील, सुशांतच्या घरचे सदस्य, त्याचा स्टाफ, मॅनेजर आणि इतर काही बड्या व्यक्तींच्या नावाची चौकशी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER