सुशांत सिंह राजपूत प्रकरण : एनसीबीचा तपास थंडावला; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

SSR Case

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR) आत्महत्याप्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाला ड्रग कनेक्शन जुळल्याने याबाबत एनसीबी कसून तपास करत आहे. रोज या प्रकरणा अनेक नवे खुलासे येत आहेत. मात्र, बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा  (एनसीबी) (NCB)  तपास अचानक थंडावला. तपास पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तातडीने पूर्ण पथक क्वारंटाईन करण्यात आले.

आता प्रत्येकाची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस तपास कामाला ब्रेक लागणार आहेत. यामुळेच चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, टेलेन्ट मॅनेजर जया सहा यांना परत पाठविण्यात आले आहे. एनसीबीची रिया व तिचा भाऊ शोविकची चौकशी सुरू असतानाच पथकातील एका अधिकाऱ्याला दोन दिवसांपासून ताप, अंगदुखी व सर्दीचा त्रास जाणवत होता.

कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा स्वब तपासणीसाठी घेण्यात आला होता. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्व पथक काहीसे तणावात आले. खबरदारी म्हणून त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. टीममधील सर्वांची आणि तो अधिकारी ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या सर्वांची टेस्ट घेतली जाणार असल्याचे एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER