सुशांतसिंह राजपूत प्रकरण : मुंबई पोलीस योग्य पद्धतीने काम करत आहेत – गृहमंत्री देशमुख

Anil Deshmukh & Shushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला (Sushant Singh Rajput case ) आता वेगळे वळण आले आहे. विरोधकांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित केली. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई पोलीस (Mumbai Police) योग्य पद्धतीने काम करत आहेत असा दाखला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिला आहे. मुंबई पोलीस हे निपुणतेने आपले काम करत असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच सुशांत प्रकरणात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई (Mumbai) पोलिसांवर राजकीय दबाव असून ते तपासात हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करत आहेत, असे देशमुख म्हणालेत. दरम्यान, सुशांत याच्या वडिलांनी पाटणा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरु केला. तर दुसरीकडे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी झाली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. केंद्राने हा तपास सीबीआयकडे देण्याबाबत अनुकुलता दर्शविली. त्यामुळे आता सीबीआय सुशांत प्रकरणी तपास कणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER