सुशांतच्या आत्महत्येवर अखेर शिक्कामोर्तब ; ‘एम्स’चा अंतिम रिपोर्ट सीबीआयकडे

Sushant Singh Rajput

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे (CBI) अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. इंडिया टुडेच्या दिलेल्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितले आहे.

माहितीनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता.

पण एम्सच्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

दरम्यान 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने सुरुवात केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER