अखेर रिया चक्रवर्ती सुटली ; न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Riya Chakraborty .jpg

मुंबई: सुशांत सिंग राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput case) ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला (Riya Chakraborty) अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रिया चक्रवर्ती ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह याची खास मैत्रिण असल्याने त्याच्या आत्महत्या प्रकरण चौकशीत रिया मुख्य आरोपी होती. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला व त्यानंतर चौकशीच्या फे-या सुरू झाल्या. या चौकशीत आत्महत्या प्रकरण हे ड्रग्जच्या दिशेने गेले व गुंता आणखीनच वाढत गेला.

अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने रियाचा सशरत् जामीन मंजूर केला आहे. मात्र, भाऊ तौसिक तुरुंगातच राहणार आहे.

ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

तर, मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER