सुशांत सिंह मृत्युप्रकरण : संयम बाळगा; मुंबई उच्च न्यायालयाचा प्रसारमाध्यमांना सल्ला

Sushant Singh death case-Bombay High Court

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh death case) याच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी बातम्या देताना संयम बाळगा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) प्रसारमाध्यमांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. ही चौकशी सुरू असताना काही प्रसारमाध्यमांवर याबाबत भडक बातम्या प्रसारित होत आहेत.

आठ  माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज न्यायालयाने माध्यमांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना तपासावर परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावे, असे न्यायालयाने म्हटले. राज्यातील माजी डीजीपी एम.

एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के. सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के. पी. रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसेच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखे करू नये. ” अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER