सुशांतसिंग आत्महत्या; संजय राऊत खोटे बोलत आहेत – आर. सी. सिंग

Sushant Singh case-Sanjay Raut

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh case) प्रकणाने आता राजकीय वळण घेतले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी ठाकरे सरकरसाठी हे प्रकरण डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात पर्यावरण मंत्री तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (CM Uddhav Thackeray) पूत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव या प्रकरणात येत असल्याने मातोश्रीचे रक्षणकर्ते समजले जाणारे शिवसेनेचे नेते सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

राऊत यांनी सुशांतसिंग यांच्या वडीलांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर राऊत हे खोटारडे आहेत ते खोटं बोलत आहेत असा आरोप ,सुशांतच्या मामाने केला आहे.

सुशांतचे त्यांच्या कुटुंबासोबत फारसे चांगले संबंध नव्हते. तसेच सुशांतच्या वडीलांनी दुसरे लग्न केले होते असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितलं की, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत. बिहारमध्ये जे राहतात त्या सगळे सुशांतच्या कुटुंबाला जाणतात. त्यांनाही माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केलं आहे, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचं वक्तव्य केलं आहे. राऊत असं वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणं ही चांगली बाब आहे का? असा संतप्त प्रश्न सुशांतचे मामा सिंग यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER