सुशांतची गर्लफ्रेंड रिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात हजर

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh case) प्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (Riya Chakraborty) आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ईडीकडून (ED) चौकशी केली सुरू आहे. ईडीने आज पुन्हा रियाची चौकशी सुरू केली असून ती ईडी कार्यालयात पोहोचली आहे.

यापूर्वी ईडीने ७ ऑगस्ट रोजी रियाची आठ तास चौकशी केली होती. आज पुन्हा रिया, तिचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडी चौकशी करत आहे. यापूर्वी रियाचा भाऊ शोविकचीही ईडीने सुमारे १८ तास चौकशी केली होती.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने वकिलांमार्फत केली होती. पण ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रियाला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागले आहे.

सुशांतचे वडील के. के सिंह यांनी रियाने सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आहे. ईडीने या प्रकरणात लक्ष घातले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER