‘आदित्यला वाचवण्यासाठी शिवसेनेकडे काँग्रेसवाले पगारी’ – नीलेश राणे

Nilesh Rane - Aaditya Thackeray

मुंबई : सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात राजकीय हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सध्या चर्चेत असलेल्या संदीप सिंहचे व भाजपचे (BJP) काय कनेक्शन आहेत याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी भेट घेत चौकशी करण्यासंदर्भात निवेदनही दिले आहे. आणि याच मुद्द्यावरून त्यावरून माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

नीलेश राणे हे सुशांत प्रकरणात सातत्यानं बोलत असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं बोट दाखवत आहेत. आजच्या ट्वीटमध्येही त्यांनी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना (Congress) शिवसेनेने  (Shiv Sena)पगारावर ठेवले आहे. रोज उठून काँग्रेसवाले संदीप सिंह आणि भाजपचं कनेक्शन शोधतायत. मीडियावाले सुद्धा दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातले खरे आरोपी शोधायचं विसरून फालतू प्रकरणात गुंतले आहेत,’ असं नीलेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER