सुशांतसिंह प्रकरण : एका राजकीय पक्षानं या प्रकरणाला वेगळं वळण दिलं ; महाराष्ट्राची बदनामी करणा-यांनी माफी मागावी – गृहमंत्री

Sushant Singh Rajput - Anil Deshmukh

मुंबई :  तीन महिन्यांपासून  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका पाहायला मिळत आहे. अखेर एम्सच्या अहवालानंतर सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एम्सच्या (AIIMS) अहवालानंतर आता महाराष्ट्रातील नेते मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) दाखवलेल्या अविश्वासावरून चीड  व्यक्त करत आहेत. एवढेच काय तर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणावर  प्रतिक्रिया दिली आहे.

अखेर सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. म्हणजे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने होता, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्राची जाणूनबुजून एका राजकीय पक्षाने बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपदेखील त्यांनी लावला आहे. यावेळी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न केला आहे. महाराष्ट्राची बदनामी करणा-यांच्या प्रचाराला जाणार का, असा खोचक प्रश्न देशमुख यांनी फडणवीस यांना केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख एम्सच्या अहवालानंतर आक्रमक झाले असून महाराष्ट्राची बदनामी करणा-यांनी माफी मागावी.

माफी मागितली नाही तर महाराष्ट्र माफ करणार नाही. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत होते. अखेर एम्सच्या अहवालानेही तेच सांगितले जे मुंबई पोलिसांनी आधीच निदर्शनास आणून दिले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या कार्यावर संशय व्यक्त करण्यात आला. अखेर एम्सच्या रिपोर्टमधून सत्य बाहेर आले, अशी संतप्त प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते  म्हणाले, सुशांतच्या शरीरात विष आढळले नाही.

मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं होता. एका राजकीय पक्षानं या प्रकरणाला वेगळं वळण दिलं. महाराष्ट्राविरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. कठपुतळीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं- असं म्हणत, महाराष्ट्राची बदनामी करणा-यांच्या प्रचाराला जाणार का, असा सवाल गृहमंत्री देशमुख यांनी फडणवीस यांना केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER