सुशांत ड्रग्स प्रकरण : NCB कडून आरोपपत्र दाखल; रिया आरोपी नं. १०

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात न्यायालयाच्या प्रतीक्षेत असलेले चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या प्रकरणात ९ महिन्यांनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) दोषारोपपत्र दाखल करणार आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात एनसीबी ड्रग्जची चौकशी करत आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ही चार्जशीट जवळपास ३० हजार पानांची आहे. या पानांच्या दोषारोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे. या दोषरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी नं. १० असल्याची माहिती आहे.

रिया आणि शौविकची आरोपपत्रात नावे

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला. या प्रकरणात ड्रग चॅट समोर आले, एनसीबीने त्याचा तपास सुरू केला. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ते ड्रग पेडलर्सपासून सुशांतच्या मॅनेजरपर्यंत चौकशी केली. त्यानंतर रिया आणि तिच्या भावाला एनसीबीने अटक केली. रिया चक्रवर्ती महिनाभर तुरुंगात राहून जामिनावर सुटली आहे. रिया चक्रवर्तीशिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचेही नाव एनसीबीच्या आरोपपत्रात आहे. माहितीनुसार, एनसीबीने आपल्या आरोपपत्रात ३३ जणांची नावे दिली आहेत. रिया चक्रवर्ती आणि शौविक व्यतिरिक्त यात अनेक ड्रग पेडलर्सची नावे आहेत. एनसीबीने चौकशीदरम्यान या ड्रग पेडलर्सना अटक केली होती.

सेलिब्रिटींशी ड्रग्सचे कनेक्शन

तपासणीदरम्यान, ड्रग्स माफियांशी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींशी कनेक्शन जोडलेले आढळले. चौकशीदरम्यान या ड्रग्स पेडलर्सची नवे समोर आले. त्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण ते सारा अली खान आणि रकुल प्रीतसिंग ते मधु मंटेना यांची या चौकशी केली. ड्रग्जप्रकरणात एनसीबीने अभिनेत्यांच्या व्यवस्थापकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केला. चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे रिया आणि शौविक यांना अटक केली. दोघे सध्या जामिनावर बाहेर आहेत.

एनसीबीने रियावर केले हे आरोप

रिया आणि शौविक यांच्यावर सुशांतला ड्रग्स पुरविल्याचा आरोप आहे. न्यायालयात रियाला जामीन देताना कोर्टाने कबूल केले की, रियाने स्वतःहून ड्रग्स विकत घेतले किंवा विकले, असा कोणताही पुरावा एनसीबीकडे नाही. रियाने म्हटले आहे की, सुशांतला केवळ त्याच्या सांगण्यावरून ड्रग्स दिले. यासाठी सुशांतने पैसे दिले आणि ड्रग्स पेडलर्सची माहिती सुशांतनेही दिली. रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पेडलर्सशी थेट संपर्कात होता.

ईडी चौकशीदरम्यान ड्रग चॅट उघड झाले
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. सुशांत केसमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणाची चौकशी करणारे एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) यांना रिया आणि शौविकच्या फोनवर ड्रग्स चॅट मिळाले. ही माहिती ईडीने एनसीबीला दिली होती, त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या ड्रग चॅटमध्ये सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा ते दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा अशी नावे होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER