सुशांत मृत्यू प्रकरण : रियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला अटक

Shovik and Samuel Miranda

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ‘ड्रग कनेक्शन’ उघड झाल्यानंतर एनसीबीने रियाचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने धाड टाकली. यानंतर शोविक आणि सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात नेले. त्यांची चौकशी सुरु आहे.

सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. काही कायदेशीर बाबींची पूर्तता एनसीबीकडून केली जात आहे. याआधी ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक करण्यात आली आहे. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर धाडी टाकून अटक करण्यात आली. बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा आरोप आहे.

गौरव आर्या हा बासित परिहार याच्या संपर्कात होता. तो टॅक्सी ड्रायवर आहे. त्याच्यावर मालाची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी होती. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक हा ही या तस्कराच्या संपर्कात होता. त्याने एकाकडे वडिलांसाठी अंमली पदार्थाची मागणी केल्याचे व्हॉटस अप मेसेज सापडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER