सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले ; शिवसेनेचा टोला

pratap sarnaik

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे . एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली, असं शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी दिली.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नाही तर हत्या केली, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतने हत्या केल्याचा दावा केला होता. सुशांतने आत्महत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. एम्स हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमुळे सर्वजण हे तोंडघशी पडले आहे, अशी टीका सरनाईक यांनी भाजपवर (BJP) केली.

मुंबई पोलिसांनी सुद्धा सुशांतने आत्महत्या केली असा तपास केला होता. पण, यावरून भाजपने राजकारण केले. ज्या मुंबई पोलिसांनी 26-11 सारख्या दहशतवादी हल्यात प्राणाची बाजी लावली, त्या प्रकरणाचा तपास केला. कोरोनाच्या काळात कर्तृव्य पार पाडले अशा पोलिसांवर भाजप नेत्यांनी आरोप केले होते, आता हे सर्व नेते तोंडावर आपटले आहे, असा टोलाही सरनाईक यांनी लगावला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER