सुशांत सिंग मृत्युप्रकरण : रिया चक्रवर्ती आणि बिहार सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रत्युत्तर सादर

Sushant Case & Rhea Chakraborty in SC

नवी दिल्ली : सुशांत सिंग राजपूत (Shushant Singh Rajput) यांच्या मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि बिहार सरकारच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात प्रत्युत्तर सादर केले. रिया चक्रवर्ती हिच्या  खटला बिहारहून मुंबईत हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना १३ ऑगस्ट रोजी प्रत्युत्तर देण्यास सांगितले होते.

या प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्याकडून श्याम दिवाण, महाराष्ट्र सरकारचे अभिषेक मनु सिंघवी, बिहार सरकारचे मनिंदर सिंग आणि केंद्रातील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपलं म्हणणं सादर केलं आहे. बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात लेखी उत्तर दाखल करताना म्हटले आहे की, पाटण्यामध्ये या प्रकरणातील एकमेव एफआयआर दाखल झाला आहे. बिहार सरकारच्या सूचनेनुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.

तर रियाच्या याचिकेला आता औचित्य नाही. त्यांच्यावतीने असेही म्हटले आहे की, रियाची याचिका रद्दबातल ठरली आहे. या उत्तरात, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव आहे आणि बिहार पोलीस तपासात सहकार्य करत नाहीत, असेही नमूद केले आहे. दुसरीकडे, रिया चक्रवर्ती हिने  आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, बिहार पोलिसांच्या आदेशावरून सीबीआयकडे चौकशीचे हस्तांतरण अधिकार क्षेत्रात येत नाही. ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने चक्रवर्ती हिच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला होता आणि संबंधित पक्षांना गुरुवारी लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER