2 एप्रिलला सूर्यवंशी रिलीज होणार

Sooryavanshi

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) सिनेमा आता 2 एप्रिल रोजी रिलीज केला जाण्याची शक्यता बॉलिवुडमध्ये (Bollywood) वर्तवली जाऊ लागली आहे. आणि याला कारण ठरले आहे केंद्र सरकारने थिएटरमध्ये 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची दिलेली परवानगी. केंद्र सरकारने देशातील थिएटर उघडण्याची परवानगी दोन-अडीच महिन्यांपूर्वी दिली होती. मात्र तेव्हा फक्त क्षमतेच्या 50 टक्केच प्रेक्षकांना परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी सिनेमा रिलीज न करण्याचाच निर्णय घेतला होता. फक्त झी ने त्यांचा ‘काली पिली’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ सिनेमे रिलीज करून 50 टक्के उपस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. साऊथमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या स्टार्सचे सिनेमे रिलीज झाले त्याप्रमाणे हिंदीत मात्र मोठ्या स्टारने तशी हिम्मत दाखवली नाही. साऊथमध्ये रवि तेजाचा ‘क्रॅक’ सुपरहिट झाला होता. त्यानंतर विजयच्या ‘मास्टर’नेही 200 कोटींचा बिझनेस केला. आता रवि तेजा त्याचा ‘खिलाडी’ सिनेमाही घेऊन येत आहे.

बॉलिवुडमध्ये खिलाडी म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षयनेही आता सिनेमागृहात येण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सिंघम’, ‘सिंबा’नंतर यशस्वी निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने यूनिव्हर्सिल कॉप सीरीजच्या धर्तीवर ‘सूर्यवंशी’ची निर्मिती केली होती. खरे तर गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे सिनेमाचे प्रदर्शन होऊ शकले नव्हते. आताही मार्चमध्ये सिनेमा रिलीज करण्याची योजना रोहित शेट्टी आणि निर्मिती संस्था रिलायंस एंटरटेनमेंटने आखली होती. पण त्याच दिवशी हॉलिवुडचा गॉडझिला व्हर्सेस काँग सिनेमा रिलीज होणार असल्याने रिलायंसने सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पण रविवारी रिलायंसचे अधिकारी, अक्षय कुमार, आणि रोहित शेट्टी यांची एक बैठक झाली. या बैठकीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आजपासून वितरकांशी बोलणी सुरु करण्यात येणार आहेत. जर 2 एप्रिलला सूर्यवंशी रिलीज झाला तर तो या वर्षातील पहिला मोठ्या स्टार्सचा सिनेमा ठरेल. 50 टक्के प्रेक्षकांच्या नियमामुळे आणि हॉलिवुडच्या सिनेमामुळे ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुढे ढकलल्याने रिलायंसने त्यांचा भारताच्या 1983 च्या वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘83’ रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सूर्यवंशीच्या मागेपुढे ‘83’ सुद्धा रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘सूर्यवंशी’च्या रिलीजचा निर्णय झाल्यानंतर आता त्याच्या मार्केटिंग आणि प्रचाराची योजना तयार करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER