
मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे, शिवसेनेचे (Shivsena)कट्टर समर्थक उपनेते आणि कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक (Suryakant Mahadik) यांचं चेबूर घाटला येथे सोमवारी(11 जानेवारी) रात्री साडे आठ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कामगार नेते सुर्यकांत माहाडीक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चेंबूर घाटला येथे त्यांच्या निवासस्थानी येणार आहेत. सूर्यकांत महाडिक यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. त्यामुळे परिसराला एखाद्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. यानंतर सूर्यकांत महाडिक यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना होणार आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली –
शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक जी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. महाडिक कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,ही प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 11, 2021
सूर्यंकांत महाडिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी विविध कामगार यूनियनचं नेतृत्व केले. सूर्यकांत महाडिक हे जवळपास 5 हजार कामगार यूनियनचा कारभार पाहत असंत. त्यांचे वय 75 वर्ष होते. महाडिक यांच्या रुपात शिवसेनेला नेहरुनगर विधानसभा मतदारसंघात पहिला आमदार मिळाला. 1990 सूर्यकांत महाडिक नेहरूनगरमधून विजयी झाले. त्यांनी दोनवेळा नेहरुनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केले. राजकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यानंतर सूर्यकांत महाडिक 2003 मध्ये भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून 17 वर्षे सूर्यकांत महाडिक कामगारांच्या प्रश्नासाठी झटत राहिले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला