हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय ; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Maharashtra Today

मुंबई :- तौते चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone)कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टोला लगावला आहे.

ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केले .

तौक्ते चक्रीवादळात कोकणातील घरं, झाडं, फळबागा तसेच इतर गोष्टींचं नुकसान झालं आहे. राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कोकण दौरा केला. त्याच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तौते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गस भेट देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : गुजरातवर दाखवलेली ममता महाराष्ट्रावरही दाखवली असती; शिवसेनेचा मोदींना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button