कोल्हापुरातील 4 हजार फेरीवाल्यांचे नावे संकेत स्थळावर

Mallinath Kalshetti

कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४,१०९ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी हरकती असल्यास ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

तसेच पाच वर्षांत पुन्हा सर्व्हे होणार नाही, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्पष्ट केले. स्थायी समिती सभागृहात शहर फेरीवाला समितीची बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला. फेरीवाला सर्वेक्षण धोरणानुसार शहरात फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार शहरातील ४,१०९ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र फेरीवाल्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात आली. यादीबाबत हरकती असल्यास ३० दिवसांत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.