महाराष्ट्राने उदयनराजेंचा अपमान सहन केला याचे आश्चर्य वाटते : निलेश राणे

Udayan Raje-Prakash Ambedkar-Nilesh Rane.jpg

मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे (Sambhaji Raje) व उदयनराजेंवर (Udayan Raje) बोचरी टीका केली असून आता यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील काल प्रकाश आंबेडकर यांच्यावर अत्यंत जळजळीत शब्दात ट्विट करून टीका केली होती.

मात्र ते ट्विट त्यांनी डिलीट केलं असून त्यामागील कारण देखील सांगितलं आहे. “प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचे खरंच आश्चर्य वाटले . घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचे माझं ट्विट डिलिट केले कारण इतरांना काहीच घेणं देणे नाही राहीले, असे ट्विट राणे  (Nilesh Rane) यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER