
मुंबई : भाजपसोबत असलेल्या जुन्या मैत्रीला तिलांजली देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. सध्या तर भाजप विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे बजावत असून, ‘ठाकरे’ सरकारला घेरण्यासाठी एकही संधी सोडत नाही. आणि अश्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुखद आणि आश्चर्याचा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस (Rashmi Thackeray’s health question)करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन (PM Modi‘s phone call)केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रश्मी ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. थेट पंतप्रधानांनी फोन केल्याने मुख्यमंत्र्यांसह अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला