सर्जिकल स्ट्राइक : पाकिस्तानला इराणचा दणका

इस्लामाबाद : इराणने मंगळवारी रात्री पाकिस्तानामध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ (Surgical strike)करुन कैदेत असलेल्या आपल्या दोन सैनिकांची सुटका केली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानातील वाहाबी दहशतवादी संघटना जैश-उल-अदलने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी इराण-पाकिस्तान सीमेवरुन आयआरजीसीच्या १२ सैनिकांचे अपहरण केले होते. या सैनिकांच्या सुटकेसाठी इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी समिती बनवली होती.

१५ नोव्हेंबर २०१८ ला पाच सैनिकांची सुटका करण्यात आली. २१ मार्च २०१९ ला पाकिस्तानी लष्कराने चार इराणी सैनिकांची सुटका केली. इराणने जैश-उल-अदलला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये राहणाऱ्या बलोच सुन्नींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जैश-उल-अदलच्या इराण सरकारविरोधात कारवाया सुरू असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER