सुरेश रैना पुन्हा चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात होईल सामील, धोनीलाही आहे विश्वास

IPL २०२०: महेंद्रसिंग धोनीलाही सुरेश रैनाच्या पुनरागमनबद्दल विश्वास आहे

Suresh Raina - MS Dhoni CSK

इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) अचानक माघारी घेतल्यावर मौन तोडून सुरेश रैनाने (Suresh Raina) सांगितले की तो आपल्या कुटुंबियांसाठी परत आला आहे आणि १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी दुबईमध्ये पुन्हा चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) सामील होईल. एमएस धोनीसह (MS Dhoni) १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय सेवानिवृत्तीची घोषणा करणाऱ्या रैनाने त्याचा आणि फ्रेंचायझीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. फ्रॅंचायझी संघात कोविड -१९ च्या १३ पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहे ज्यामध्ये दोन खेळाळूचंही समावेश आहे आणि रैनाच्या माघारचे कारण हेच सांगितले जात आहे.

पुन्हा संघात सामील होणार सुरेश रैना!
रैनाने क्रिकबजला सांगितले की, ‘हा वैयक्तिक निर्णय होता आणि मला माझ्या कुटुंबासाठी परत यावे लागले. घरात अशी एक गोष्ट होती जी त्वरित सोडवणे आवश्यक होते. CSK देखील माझे कुटुंब आहे आणि माझ्यासाठी माही भाई (धोनी) खूप महत्वाचा आहे. हा एक कठीण निर्णय होता.’ तो म्हणाला, ‘CSK आणि माझ्यात कोणतीही मतभेद नाही. कोणीही १२.५ कोटी रुपये परत दर्शविणार नाही आणि कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय जाणार नाही. जरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे पण मी अजूनही तरूण आहे आणि मला त्यांच्याकडून पुढील चार-पाच वर्षे आयपीएलमध्ये खेळायचे आहे.’ जेव्हा त्याला CSK बरोबर त्याच्या भविष्याबद्दल विचारले असता त्याने दुबईतील संघात प्रवेश घेण्याचे संकेत दिले. तो म्हणाला, ‘मी क्वारंटीनच्या काळात येथे प्रशिक्षण घेत होतो. कदाचित आपण मला तेथील शिबिरात पुन्हा पहाल.’

चेन्नई सुपरकिंग्ज म्हणाला- सुरेश रैनाचे स्वागत आहे
जेव्हा CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांना रैनाच्या फ्रँचायझीच्या भविष्याबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की संघ आपल्या सर्व खेळाडूंचे पूर्ण समर्थन करते. ते म्हणाले, ‘रैना म्हणाला की सत्रासाठी तो उपलब्ध नाही आहे. आम्ही आमच्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा देत असतो. तो म्हणाला की त्याचे काही वैयक्तिक मुद्दे चालू आहेत. म्हणून जेव्हाही तो तंदुरुस्त आणि तयार असेल तो परत येऊ शकतो. हेच आपल्याला हवे आहे.’ मीडिया रिपोर्टनुसार चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला देखील अपेक्षा आहे कि सुरेश रैना IPL २०२० मध्ये परत येऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER