क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे दरोडेखोरांच्या हल्ल्यात निधन

Suresh Raina uncle killed by robbers

वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या आयपीएलमधून (IPL) माघार घेतल्याचे शनिवारीच जाहीर केलेला चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या काकांचे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पठाणकोट येथे निधन झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात काले कच्छेवाल टोळीच्या तीन-चार सदस्यांनी हा हल्ला केला. अशोककुमार (वय ५८) असे सुरेश रैनाच्या काकांचे नाव आहे. ते माधोपूरनजीक थरियाल नावाच्या गावात राहात होते. तेथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात अशोककुमार यांचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. अशोककुमार हे सरकारी ठेकेदार होते. १९ व २० ऑगस्ट दरम्यानच्या रात्री हा हल्ला झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER