UAEहून अचानक भारतात परतला सुरेश रैना, ह्या कारणास्तव नाही खेळणार IPL 2020

Suresh Rain

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) कौटुंबिक कारणांमुळे युएईहून मायदेशी परतला आहे.

कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित होत आलेल्या प्रश्नांमध्ये क्रिकेटपटू यातून बाहेर पडण्याचा क्रम सुरू आहे. युएईमध्ये होत असलेल्या या मोसमातील इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी यापूर्वी आपली नावे मागे घेतली होती. आता चेन्नई सुपर किंग्जलाही चांगलाच धक्का बसला आहे. केवळ चेन्नई संघाचाच नाही तर लीगचा सर्वात दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक सुरेश रैना अचानक युएईहून भारतात परतला. हा मोसम सोडणारा रैना हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. परंतु त्याच्या परत येण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

चेन्नई संघाने स्वतः सर्वांना दिली माहिती

चेन्नईच्या टीम मैनेजमेंटने शनिवारी सकाळी एका ट्विटद्वारे रैनाच्या परत येण्याची माहिती सर्वांना दिली. चेन्नई संघाच्या ट्विटर हँडलवरून सीईओ के एस विश्वनाथन यांचे विधान ट्विट केले गेले आहे. विश्वनाथन म्हणाले, ‘सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे आणि संपूर्ण आयपीएल हंगामात उपलब्ध राहणार नाही. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज सुरेश आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य करेल.’ रैनाने नुकताच १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सुरेश रैनाने २२६ एकदिवसीय सामन्यात पाच शतकांच्या मदतीने ५६१५ धावा केल्या आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने शतकी खेळीसह १६०५ धावा केल्या आहेत.

 रैनाच्या जवळच्या कुटुंबातील मृत्यूची बातमी

रैना कुटुंबाच्या निकटच्या काही सूत्रांनी सुरेशच्या काकाची पंजाबमध्ये निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्याच्या काकाची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि सुरेश अगदी जवळचा होता. या जवळच्या सूत्राचे म्हणणे आहे की सुरेशच्या कुटुंबीयांना या अपघाताने मोठा धक्का बसला आहे आणि म्हणूनच तो परत आला आहे.

पुढे हंगामात का खेळणार नाही?

वास्तविक यावेळी आयपीएल युएईमध्ये झाल्यामुळे बर्‍याच प्रकारचे प्रोटोकॉल लागू झाले आहेत. सुरेश रैना एक-दोन आठवड्यानंतर युएईला परत आला तर त्याला पुन्हा ७ दिवस आइसोलेशन राहावे लागेल. या दरम्यान पुन्हा ५ कोरोना चाचण्या घेण्यात येईल. अशा परिस्थितीत आयपीएल जवळजवळ अंतिम टप्प्यात पोहोचली असती आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे सुरेश मानसिकरित्या शंभर टक्के योगदान देऊ शकला नसता. असा विश्वास आहे की याच कारणास्तव त्याने हंगामातून माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER