शिवसेनेला भिवंडीत झटका; मोठ्या नेत्याने दिला राजीनामा, काँग्रेसच्या वाटेवर

Shivsena-Congress

भिवंडी :- माथेरान नगरपालिकेत (Matheran Municipality) नुकतेच १० नगरसेवक भाजपाच्या गळाला लागल्याची घटना ताजी असताना भिवंडीतही शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पडले. सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) ऊर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासह जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख व ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे यांच्यावर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. यामुळे म्हात्रे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. व्यक्तिगत कारण देत सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना सदस्य पदाबरोबरच जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. आता बाळ्या मामा यांनी राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेससोबत जाणार अशी चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button