शरद पवारांच्या ‘त्या’ बैठकीला पंकजा मुंडेंसह सुरेश धसांना नाकारला प्रवेश; कार्यकर्त्यांचा राडा

Munde-Suresh Dhas-Pawar

मुंबई :- ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सध्या वादंग पेटले आहे. ऊसतोड कामगारांच्या करार नूतनीकरणाची आज (मंगळवारी) पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत.

मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या संघटनेलाही प्रवेश नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवरच राडा केला आहे. ऊसतोड आंदोलन पेटवणाऱ्या संघटनांनाच साखर संघाच्या करार बैठकीत प्रवेश नाही, असा आरोप केला जात आहे.

ऊसतोड कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. पण त्यांनी गेटवरच धरणे आंदोलन करताच त्यांना प्रवेश मिळाला. पण वंचितच्या प्रतिनिधीना अजूनही प्रवेश न मिळाल्याने त्यांनी इन्स्टिट्यूट गेटवरच राडा सुरू केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजा मुंडे संतापल्या 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER