पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचा अवतार आहेत : मंत्री सुरेश भारद्वाज

Suresh Bhardwaj-PM Modi

सिमला :- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराचा अवतार आहेत.’ असे हिमाचलप्रदेशचे शहर विकासमंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी म्हटले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिमलामधील राम मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलले. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच गाजत आहे.

भारद्वाज काय म्हणाले?

पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना सुरेश भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट शंकराशी केली. ‘शंकराचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रकटले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निकालापूर्वी मोदी दोन दिवस केदारनाथमध्ये होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला.” असा दावा भारद्वाज यांनी केला.

“भारताने अन्य देशांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सामना चांगला केला आहे. भारतामध्ये विकसित देशांपेक्षा मृत्युदर कमी आहे. मोदींना शंकराचे वरदान प्राप्त असल्यानेच त्यांनी या संकटाचा चांगल्या पद्धतीने सामना केला. या अनुभवानंतर संपूर्ण जग त्यांच्याकडे नेता म्हणून पाहात आहे.” असेही भारद्वाज म्हणाले. हिमाचलप्रदेशातील मंडी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सव शुक्रवारपासून सुरू होणार आहे. हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर याचे उद्घाटन करणार आहेत. हा महोत्सव सात  दिवस चालणार. यामध्ये अनेक पंजाबी गायक तसेच स्थानिक कलाकार कला सादर करणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER