सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ‘ते’ वर्तन बेकायदा, आयएएस संघटनेने व्यक्त केली नाराजी

Surajpur district collector - Maharashtra Today

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषध आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याच्या कानशिलात लगावली, त्याला पोलिसांकडून मारहाण केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वर्तनाबाबत आयएएस असोसिएशनने नाराजी व्यक्त केली असून हे वर्तन नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे, असे म्हटले आहे.

सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे कृत्य केले ते अस्वीकाहार्य आणि सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. सनदी अधिकाऱ्याने नेहमी सहानुभूतीचे वर्तन केले पाहिजे आणि अशा कठीण परिस्थितीत समाजाबाबत संवेदनशील राहिले पाहिजे. आयएएस असोसिएशन या कृत्याचा निषेध करत आहे, असे ट्वीट आयएएस असोसिएशनने केले आहे.

या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा अरेरावी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि अनेकांनी सोशल मीडियावर आयएएस असोसिएशला टॅग करून प्रश्न विचारले जात होते. मुख्यमंत्री बघेल यांनी या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अनेकांनी केली होती. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी या घटनेबाबत माफी मागितली आहे.

घटना

सुरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषध आणायला गेलेल्या युवकाला ‘प्रिस्क्रिप्शन’ दाखवल्यानंतरही मारण्यात आले. त्याचा मोबाईल जिल्हाधिकाऱ्यांनी फोडला आणि त्याला कानशिलातही लावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button