
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुरब्बी राजकारणी असण्याबरोबरच कला आणि कलाकारांना कदर करणारे नेते आहेत. हे आजपर्यंत अनेक उदाहरणांवरून सांगता येणार. एवढेच नाही तर, राज्य आमि केंद्रिय स्तरावर जाणते राजकारणी, वयाने एंशी पुर्ण केलेले ज्येष्ठ राजकारणी नेते असले तरी लहानातल्या लहान कलाकारांच्या कलेचं कौतुक करताना त्यांचं कोणतंही मोठं पद आड येत नाही. कलाकार लहान असो वा मोठा ते त्यांचं भरभरून कौतुक करताना दिसतात.
नुकतेच सुरभी या मुलीने हस्तकलेतून साकारलेले एक शुभेच्छापत्र शरद पवार यांना पाठवले. ते शरद पवार यांना इतके आवडले की, त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवरून त्या शुभेच्छापत्राचा व्हिडिओ शेअर करून सुरभी आणि तिच्या कलेचं विशेष कौतुक केलं आहे.
बावधन खुर्द येथील सुरभि अनिता युवराज पवार या मुलीने हस्तकलेच्या माध्यमातून केलेली शुभेच्छापत्राची ही सुंदर कलाकृती मला भेटस्वरूप पाठवली. ती पाहताना मला खूप आनंद वाटला. देशातील सुकन्यांच्या हाती कलेचं जे हुनर आहे त्याचं मूल्य मोठं आहे. सुरभिला मनापासून धन्यवाद व अनेक शुभेच्छा! अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.
या व्हिडिओत शरद पवार ते शुभेच्छापत्र कौतुकाने न्याहाळताना दिसत आहेत.
