आमच्या पाठीत सुरा भोसकला – मुकेश साहनी

जागावाटप जाहीर होताच विकासशील इंसान पार्टी पडली महाआघाडीतून बाहेर

Mukesh Sahni

पाटणा :- विधानसभेसाठी राजद – काँग्रेस महाआघाडीचे जागावाटप जाहीर होताच महाआघाडीतील मतभेद उफाळून आले. आमच्या पाठीत सुरा भोसकला, असा संताप व्यक्त करत विकासशील इंसान पार्टीचे नेता मुकेश साहनी (Mukesh Sahani) महाआघाडीच्या पत्रपरिषदेतून उठून गेले. उद्या रविवारी पत्रपरिषदेत माझी बाजू मांडेन, असे त्यांनी सांगितले.

साहनी म्हणाले- आमच्याबाबत महाआघाडीत जे घडले ते पाठीत सुरा भोसकणे आहे. हा अनुसूचित जातीच्या लेकराबाबत अन्याय आहे. मला २५ जागा आणि उपमुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण, जागावाटपात अतिमागास वर्गाला धोका देण्यात आला. हे चूक आहे. यानंतर पत्रपरिषदेत गोंधळ झाला. मुकेश साहनी पत्र परिषदेतून उठून गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER