बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय

Supriya Sule's victory in Baramati

बारामती: बारामतीत यंदा कमळच फुलणार म्हणून साम-दाम-दंड-भेद वापरून दंड थोपटणा-या  मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट होत असताना सुप्रिया सुळे यांनी १,५७,०४२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

राज्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना सुप्रिया सुळे यांनी पक्ष आणि पवारांची प्रतिष्ठा राखली आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा आज सर्वांत  मोठा उत्सव आहे. १७ व्या लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या मैदानात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महाराष्ट्रातल्या एकूण ४८ जागांसाठीची  मतमोजणी  आहे.

महाराष्ट्रातला पहिला निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults