
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कोरोना (Corona) लसीबाबत कोणताही दावा करू नये. सुप्रिया सुळे (Supriya Sule) संसदेच्या सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे. पुणे काय देशाच्या बाहेर आहे का? लोकसभेच्या सदस्य असून अशा प्रकारचे बालिश वक्तव्य करणे चुकीचे, असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते .
सुप्रिया सुळे यांनी काल (२८ नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केली होती. मोदींनी काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन शास्त्रज्ञांशी कोरोना लसीबाबत चौकशी केली होती. मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून सुप्रिया यांनी ‘दुनिया घूम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’, असा टोला लगावला होता.
“एक लाख कोटींवर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणी तरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली.” अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे.
ही बातमी पण वाचा : मग कोरोना लशीचे बारामतीच्या लॅबमधून वितरण करणार का? चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला