लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

supriya-sules-letter-to-cm-regarding-corona-vaccine

मुंबई :- कोरोना (Corona Virus) महामारीच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणामुळे देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जात आहेत.

राज्यात देखील मोठ्याप्रमाणात लसीकरण पार पडत असून राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी लसीकरणाविषयी मुख्यमंत्री ठाकरेंकडे महत्वाची मागणी केली आहे. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्यांनी या पत्राद्वारे राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन देखील केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER