साहेबांची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते : सुप्रिया सुळेंनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते दिग्ग्जनेते मंडळींनी त्यांच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शरद पवार यांची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही आपल्या खास शैलीत पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत .

शुभेच्छा देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER