मोठे नेते, मोठे कुटुंब ; सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेला फोटो पाहिला का?

Supriya Sule & Family

मुंबई : देशाच्या राजकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मोठं नाव आहे. . पवारांसोबत अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे, पार्थ पवार (Parth Pawar) आणि आता रोहित पवार (Rohit Pawar) हे देखील राजकरणात सक्रिय आहेत . एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट केला आहे.

आपल्या माणसांनी दिलेले आशीर्वाद मनात जपा आणि आपल्याला जे मिळालंय, तुम्ही ज्या माणसांना ओळखता, तुम्ही माणूस म्हणून जसे घडले आहात, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, अशा खास भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या वाढदिवसाचा फॅमिली फोटो ट्विट केला आहे. या फोटोत 70 हून अधिक लोकं आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच वयाची 80 वर्ष पूर्ण केली. विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा झाला. पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं. अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण शेवटी कुटुंबाशिवाय सगळं अधुरं आहे. संध्याकाळी पवारसाहेबांच्या वाढदिवसाला सगळं कुटुंब एकत्र जमा झालं. कुटुंबप्रमुखाचा वाढदिवस असल्याने सगळेजण आनंदी होते. शुभेच्छांचा फॉर्मल कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी मिळून हा फोटो काढला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER