ठाकरे कुटुंबियांच्या भेटीचा फोटो टाकत जातीचा उल्लेख केल्याने सुप्रिया सुळे ट्रोल

CKP Moment Supriya Sule
CKP Moment Supriya Sule

मुंबई : सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतले. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, यांची दोन्ही मुलं असा परिवार उपस्थित होता. या भेटी दरम्यान काढण्यात आलेला फोटो खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरवर अपलोड केला, पण त्यावर नेटिझन्सकडून मात्र जोरदार टीका केली जात आहे.

सुप्रिया सुळेंनी काढलेल्या सेल्फीत मागे त्यांचे पती सदानंद सुळे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई आणि शौनक पाटणकर आहेत. ही पोस्ट टाकताना सुप्रिया सुळेंनी जातीचा उल्लेख केला.

वर्षा राजपूत म्हणतात, “वैयक्तिक फोटोला जातीयवादी स्वरूप देणे योग्य वाटत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER