सुप्रिया सुळे यांनी घेतली महामार्ग पोलिसांच्या अत्याधुनिक कारची माहिती

Supriya Sule

औरंगाबाद :- खासदार सुप्रिया सुळे या औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर असताना कन्नड येथे जात असताना थांबून अत्याधुनिक कारची पाहणी केली. महामार्ग पोलिस खुलताबाद सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, पोलिस हेड काॅन्सटेबल अमर आळंजकर, अभिजीत गायकवाड यांनी महामार्गावरील अपघात कमी होण्याकरता पुरवण्यात आलेले इंटर्सप्टर वाहना बाबतीत सविस्तर माहिती दिली व महामार्गावरील अपघाताचे प्रमाण जनजागृती करून कशाप्रकारे कमी होतील याबाबत सविस्तर माहिती दिली.

Supriya

सदर माहिती समजावून घेऊन सुप्रिया सुळे यांनी सदर उपक्रमा संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलाचे कौतुक केले. सदर जनजागृती अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक मुंबई विनय कारगावकर, पोलिस अधीक्षक मुख्यालय मुंबई विजय पाटील व पोलिस अधीक्षक पुणे विभाग मिलिंद मोहिते, औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, महामार्ग पोलिस निरीक्षक नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.